इतर बातम्याजिल्हाभाजपमहाविकासआघाडीमोठी बातमीराज्यराष्ट्रवादी

पालकमंत्री अतुल सावे यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या आमदार आजबेंना माळी समाज जागा दाखवून देणार.

0

माझा कट्टा | डेस्क

प्रोटोकॉल पाळायचा म्हणजे नेमकं काय करायचं ? तुमच्या आघाडीची सत्ता असताना भारतीय जनता पार्टीच्या एकही आमदाराला तुमच्या सरकारने यांनी फुटकी कवडी देखील देण्याची दानत दाखवली नाही. आजबे साहेब चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे असतात, हे तुम्हाला व सरकारला का कळले नव्हते. जैसी करणी वैसी भरणी जो दूरदृष्टीचा राजकारण करतो, त्याला हे सांगण्याची गरज पडत नाही.

टक्केवारी ने पैसे खाण्याचे सोडाच पण औपचारिकता म्हणून आमचे नेते चहा देखील पीत नाहीत. औद्योगिक आमचा माळी समाजाचा नेता हा गर्भ श्रीमंत आहे. तुमच्यासारखे खरकाटे ताट ते पुसून खात नाहीत. तुमच्या विधानसभा मतदारसंघात गुत्तेदार, बांधकाम विभाग, पाटबंधारे कार्यालय, तहसील विभाग हे कोणतेही अधिकारी तुमच्या कार्यपद्धतीवर समाधानी नाहीत. टक्केवारी खायची सवय कदाचित तुम्हाला असेल. मात्र आमच्या समाजाचे नेते अतुल सावे हे कसल्याही प्रकारचे बटलेले नाही. ही गोष्ट ध्यानात धरा.. यापुढे कदापि आमच्या समाजाची नेत्याची अशी मानहानी समाज सहन करणार नाही.

बहुसंख्य माळी समाज हा आपल्या कर्माशी कामाशी प्रामाणिक असतो. तो कुणापुढेही तुटपुंज्या पैशाला लालसेसाठी कुणापुढेही लाळ घोटपणा करत नाही. आपले जे आरोप आहे ते बिनबुडाचे नैराश्यातून झालेले आहेत. त्याला माळी समाज कधीच भिक घालणार नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला माळी समाज आपली जागा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असे इशारा माळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष धनंजय काळे यांच्यासह माळी महासंघ पदाधिकारी संतोष कंठळे, नितीन नन्नवरे,अशोक शिंदे, बबलू दुधाळ ,अविनाश घाडगे,अमोल वाघमारे,पवन राऊत, विकास सत्वधर,किरण ढगे ,भारत वानी,राहुल काळे, उत्रेशवर राऊत, ज्ञानेश्वर राऊत, आकाश मेहेत्रे यांनी दिलाय

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी – ॲड. सुभाष राऊत

Previous article

प्रीतम मुंडेंचे जाहीर कार्यक्रमातून खळबळजनक वक्तव्य ; म्हणाल्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तहसीलदारांना चिरीमीरी द्यावी लागते

Next article

You may also like

Comments

Comments are closed.