इतर बातम्या

रस्त्यासाठी मनसे सैनिकाने थेट रस्त्यावरील खड्ड्यातचं केली अंघोळ…

0

माझा कट्टा – डेस्क

– बीडच्या शिरूर कासार शहरातील मुख्य रस्त्यावर साचलेल्या खड्ड्यातील गढुळ पाण्यात अंघोळ करून मनसे सैनिक सोपान मोरे यांनी अनोखे लक्षवेधी आंदोलन केले आहे.गत अनेक वर्षांपासून शहरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. या खड्डयात पावसाळ्यात पाणी साचत असते.या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून नगरपंचायत प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा करून देखील त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सोपान मोरे यांनी हे अनोखे आंदोलन केले आहे. शहरातील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या खड्डयाची पूजा करून श्रीफळ फोडून आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर वाजंत्री वाजवून स्थानिक नागरिकांना जागे करत स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ असलेल्या मोठ्या खड्डयाभोवती फुलांची आरास मांडत पूजा केली.या वेळी प्रशासनाच्या निषेधार्ह घोषणा देत साचलेल्या गढूळ पाण्यात मोरे यांनी अंघोळ केली. त्यामुळं आतातरी या नगर पंचायतला जाग येणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे..

अजित पवारांनी बोलावली आमदारांची बैठक..राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार ? तर या भूकंपाचे धक्के राजभवनापर्यंत पोहोचनार..?

Previous article

अविनाश साबळेंनी पटकावले स्टीपलचेस स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक

Next article

You may also like

Comments

Comments are closed.