इतर बातम्या

द्वारकादास मंत्री बँकेची ही कारवाई नियमबाह्य; नगरपालिका मुख्याधिकारी नीता अंधारे जाणार कोर्टात..

0

माझा कट्टा | डेस्क

– बीड शहरातील नगरपालिकेच्या नाट्यगृहाला, शहरातील द्वारकादास मंत्री बँकेने घेतलेल्या कर्जाची नगरपालिकेने परतफेड न केल्याने, तारण ठेवलेल्या नाट्यगृहाला सील ठोकलं आहे. हे सील ठोकतात नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे या काही मिनिटात नाट्यगृहात दाखल झाल्या. तर बँकेची ही कारवाई नियमबाह्य आहे. बँकेने कोणतीही नोटीस आम्हाला दिलेली नाही. आम्ही सेटलमेंटसाठी संबंधित बँकेच्या मॅनेजरला पत्र लिहिले. मात्र त्यांनी केवळ कर्मचारी पाठवला, त्यांचे कोणतेही अधिकारी बैठकीला आले नाहीत. त्यामुळे सदरील बँकेच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. अशी प्रतिक्रिया नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी द्वारकादास मंत्री बँकेने नाट्यगृहाला सील ठोकल्यानंतर दिली आहे.

काय म्हणाल्या नीता अंधारे पहा…

यावेळी त्या म्हणाले की नगरपालिकेची इमारत बांधण्यासाठी 2004 साली द्वारकादास मंत्री बँकेकडून आम्ही एक कोटी कर्ज घेतलं होतं. त्यासाठी बँकेला तारण म्हणून नाट्यगृहाची इमारत दिली होती. तर आतापर्यंत 2 कोटी 9 लाख रुपयांची परतफेड नगरपालिकेने बँकेची केली आहे. मात्र तरी देखील सदरील बँक 1 कोटी 4 लाख रुपये नगरपालिकेकडे बाकी काढत आहे. तर ही बाकी नेमकी कोणत्या आधारे आहे, ते तुम्ही शो करा. असं नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी म्हटलं होतं. मात्र सदरील बँकेने बाकी नेमकी कोणत्या आधारे आहे, हे सांगितलं नाही. त्याचबरोबर सील करण्याचे कोणतेही नोटीस नगरपालिकेला दिली नाही. ही केलेली कारवाई नियमबाह्य असून केवळ स्टंट मारण्यासाठी केलीय. त्यामुळं या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. असं देखील यावेळी मुख्याधिकारी नीता अंधारे म्हटल्या आहेत..

दरम्यान नगरपालिकेचे देखील द्वारकादास मंत्री बँकेकडे बाकी आहे. त्यामुळे आता आम्ही देखील कायदेशीर कारवाई करू. असा दम यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी भरला आहे. यामुळे आता बीडमध्ये नगरपालिका विरुद्ध द्वारकादास मंत्री बँक, असं काहीसं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे..

@@बँक प्रशासनाचं काय म्हणणं आहे ?

बीड नगरपालिकेने गेल्या पंधरा वर्षांपूर्वी द्वारकादास मंत्री बँकेकडून नगरपालिकेची इमारत बांधण्यासाठी कर्ज घेतलं होतं. मात्र या कर्जाची परतफेड नगर पालिकेने वेळेवर केली नाही. 2019 पासून नगरपालिकेने बँकेचा एकही रुपया भरला नाही. त्यामुळे संबंधित द्वारकादास मंत्री बँकेने आज नाट्यग्रहाचा ताबा घेत, या नाट्यगृहाला सील ठोकलं आहे. विशेष म्हणजे यानंतरही नगरपालिकेने आठ दिवसात कर्जाची परतफेड केली नाही, तर सदरील नाट्यगृहाचा लिलाव केला जाणार असल्याचं, द्वारकादास मंत्री बँकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं आहे

बीडमध्ये द्वारकादास मंत्री बँकेचा बीड नगर पालिकेला दणका..

Previous article

अजित पवारांनी बोलावली आमदारांची बैठक..राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार ? तर या भूकंपाचे धक्के राजभवनापर्यंत पोहोचनार..?

Next article

You may also like

Comments

Comments are closed.