इतर बातम्याकोर्ट निकालक्राईम न्यूजखूनजिल्हान्यायालय निकालबीडब्रेकिंगराज्य

प्रेमविवाह केल्याचा रागातून गर्भवती सुनेवर सपासप वार करून खून; सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

0

माझा कट्टा | डेस्क

मुलाने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून, गर्भवती सुनेवर धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करणाऱ्या सासऱ्यास, जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. विशेष म्हणजे यादरम्यान स्वतःच्या पत्नीवरही आरोपीने प्राणघातक हल्ला केला होता. बालाजी लव्हारे रा. पट्टीवडगाव, ता. अंबाजोगाई असे आरोपीचे नाव आहे. यास, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. घरत यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या पट्टीवडगाव येथे, 2020 साली सदरील घटना घडली होती. आरोपी बालाजी याच्या मुलाचा मयत शीतल हिच्या सोबत प्रेमविवाह झाला होता. याचा राग बालाजीच्या मनात होता. 27 ऑगस्ट 2020 रोजी शीतल तिच्या आईसोबत फोनवर बोलत असताना, सासरा आरोपी बालाजी लव्हारे याने तिच्या मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार करून तिचा खून केला. यावेळी शीतल सहा महिन्याची गर्भवती होती. या दरम्यान आरोपी बालाजीची पत्नी सुवर्णा या सुनेला सोडविण्यासाठी गेल्या असता बालाजीने त्यांच्याही पाठीत कुऱ्हाडीने दोन वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी मयत शीतलचे वडील किसन कराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी लव्हारे याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम 302, 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान सुनावणीवेळी सरकारी पक्षाच्या वतीने 13 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. घरत यांनी बालाजी लव्हारे यास दोषी ठरवून जन्मठेप आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावलीय.

परळीत घरगुत्ती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

Previous article

पुन्हा मुंडे बहीण भावाची होणार लढत..

Next article

You may also like

Comments

Comments are closed.