इतर बातम्या

अजित पवारांनी बोलावली आमदारांची बैठक..राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार ? तर या भूकंपाचे धक्के राजभवनापर्यंत पोहोचनार..?

0

माझा कट्टा | डेस्क

– राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत. तर याच राजकीय भूकंपाचे धक्के राजभवनापर्यंत पोहोचणार असल्याचं चित्र राजकीय वर्तुळातून दिसून येत आहे.

राज्यातील सरकारला गेल्या 2 दिवसांपूर्वीच 1 वर्ष पूर्ण झाले असतानाच राज्यात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप उंबरठ्यावर आला आहे. येत्या काही तासातच राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत असून आज रात्रीपर्यंत राज्याला मोठे राजकीय धक्के बसतील असे संकेत मिळत आहेत. अजित पवारांनी आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक घेतली असुन या बैठकीत काही तरी मोठे ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला होता. त्यावर पक्षाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र यासाठी शरद पवारांनी येत्या 6 जुलैला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे. मात्र असं असताना आज विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी स्वतःच्या देवगिरी निवास्थानी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावलीय.

तर या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी नेत्यांसह जवळपास 25 ते 30 आमदार उपस्थित असल्याची माहिती आहे. या बैठकीला खा. सुप्रिया सुळे या उपस्थित असून जयंत पाटील मात्र गैरहजर आहेत.

तर दुसरीकडे राजभवनात देखील वेगळ्याच हालचाली सुरु असून यामुळे देखील वेगळे संकेत मिळू लागले आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यासंदर्भात पत्रकारपरिषद घेऊन अजित पवार यांना विरोधीपक्ष नेता म्हणून आमदारांची बैठक घेण्याचा अधिकार आहे. संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. बैठक का बोलवली माहीत नाही. बैठकीतला तपशील माझ्याकडे नाही. दादांनी आमदारांची बैठक बोलावली. ही सगळी चर्चा 6 तारखेच्या बैठकीत समोर येईल. त्यांनी जाहीर भाषणात सागितलं मला संघटनेत काम करण्याची इच्छा आहे. मात्र हा निर्णय मी एकटा कधीच घेत नसतो. सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेतो. आमच्या पक्षात काहीही असल तरी आम्ही चर्चा करून मार्ग काढतो. असंही यावेळी शरद पवार म्हणाले..

दरम्यान जर राजकीय भूकंप झाला तर बीड जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे

द्वारकादास मंत्री बँकेची ही कारवाई नियमबाह्य; नगरपालिका मुख्याधिकारी नीता अंधारे जाणार कोर्टात..

Previous article

रस्त्यासाठी मनसे सैनिकाने थेट रस्त्यावरील खड्ड्यातचं केली अंघोळ…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.