Fireइतर बातम्याजिल्हापरळीबीडब्रेकिंगराज्यस्फोट

परळीत घरगुत्ती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

0

माझा कट्टा | डेस्क

बीडच्या परळी शहरात एका घरात अचानक गॅसच्या सिलेंडरचा भीषण स्फोट झालाय. यामध्ये 14 वर्षीय मुलगा ठार झाला असून अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रात्री 8 च्या दरम्यान शहरातील बरकत नगर भागात घडलीय.

अदिल उस्मान शेख वय 14 असं स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तर शमशाद बी सय्यद हाकीम, शेख आवेस गौस व अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर परळी शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत

प्राथमिक माहितीवरून घटनास्थळ असणाऱ्या घराच्या बाजूला आग लागली होती. आग एका बंद असलेल्या रूममध्ये जाऊन तेथील गॅसचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की बाजूला असलेल्या अदिल शेख याच्या पोटाला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तर शमशाद बी सय्यद हाकीम,शेख आवेस गौस व अन्य दोन जण जख्मी झाले आहेत. दरम्यान घटनेची माहिती कळताच परळी पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचे शरद पवारांना भावनिक पत्र

Previous article

प्रेमविवाह केल्याचा रागातून गर्भवती सुनेवर सपासप वार करून खून; सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.