इतर बातम्या

बीडमध्ये द्वारकादास मंत्री बँकेचा बीड नगर पालिकेला दणका..

0

माझा कट्टा | डेस्क

– बीड शहरातील द्वारकादास मंत्री बँकेने बीड शहराची शोभा वाढवणाऱ्या नाट्यगृहाला सील ठोकलंय. बीड नगरपालिकेने गेल्या पंधरा वर्षांपूर्वी द्वारकादास मंत्री बँकेकडून नगरपालिकेची इमारत बांधण्यासाठी कर्ज घेतलं होतं. मात्र या कर्जाची परतफेड नगर पालिकेने वेळेवर केली नाही. 2019 पासून नगरपालिकेने बँकेचा एकही रुपया भरला नाही. त्यामुळे संबंधित द्वारकादास मंत्री बँकेने आज नाट्यग्रहाचा ताबा घेत, या नाट्यगृहाला सील ठोकलं आहे. विशेष म्हणजे यानंतरही नगरपालिकेने आठ दिवसात कर्जाची परतफेड केली नाही, तर सदरील नाट्यगृहाचा लिलाव केला जाणार असल्याचं, द्वारकादास मंत्री बँकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं आहे

सदरील ताब्यासाठी लावलेल्या जाहीर सूचनेच्या नोटीस वर लिहीण्यात आलं आहे, की “सर्व जनतेस कळविण्यात येते, की खालील उल्लेख केलेली मालमत्ता द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लिमिटेड बीड यांच्याकडे कर्जापोटी तारण असून कर्जाची नियमितपणे परत फेड न केल्यामुळे द्वारकादास मंत्री बँक सहकारी बँक, बीड शाखा बीड, यांनी सेक्युरिटी टायझेशन अॅक्ट 2002 नुसार आज रोजी सदर मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतलेला आहे. तरी सदरील मालमत्ते बाबत कोणी खरेदी विक्रीचा व्यवहार करू नये. जर कोणाला मालमत्ता खरेदी करायची असेल , तर खालील क्रमांकावर संपर्क साधावा, कर्जदाराचे नाव मुख्याधिकारी नगरपालिका बीड. असा उल्लेख द्वारकादास मंत्री बँकेने नाट्यगृहावर लावलेल्या नोटीसवर आहे.

काय आहे प्रकरण पहा..

दरम्यान बीड शहराची शोभा वाढवणारी अतिशय महत्त्वाची वास्तू म्हणून नाट्यगृहाकडे पाहिलं जातं..मात्र आज नगर पालिकेच्या गलथान कारभारामुळे नाट्यगृहाला सील ठोकण्यात आलंय..

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाचं असणार धनंजय मुंडेंचा संकल्प

Previous article

द्वारकादास मंत्री बँकेची ही कारवाई नियमबाह्य; नगरपालिका मुख्याधिकारी नीता अंधारे जाणार कोर्टात..

Next article

You may also like

Comments

Comments are closed.