क्राईम न्यूजजयदत्त क्षीरसागरजिल्हाराज्य

बीडच्या आमदारांची वडिलांनाच धक्काबुक्की ? आमदार विरोधात पित्याची पोलिसात तक्रार..

0

माझा कट्टा | बीड

– बीडच्या राजकारणातील मातब्बर क्षीरसागर कुटुंबात, काका पुतण्यानंतर आता पुन्हा एकदा बाप लेकाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वडिलांनी मुलाने धक्का बुक्की केल्याची तक्रार, बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे बंधू अर्जुन क्षिरसागर यांनी, तुमच्या बहिणीला घरी का बोलावलं ? असं म्हणत धक्काबुक्की केल्याचा आरोप वडील रवींद्र क्षीरसागर यांनी तक्रारीतून केला आहे.. या प्रकरणी आमदार संदिप क्षीरसागर आणि अर्जून क्षीरसागर यांच्यावर कलम 323 ,504, 506 ,34 ,भा,द,वि प्रमाणे N. C दाखल करण्यात आलीय. दरम्यान पिता-पुत्रात हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला ? हे अद्याप समोर आले नाही. मात्र या वादाची राजकीय वर्तुळात चर्चां होत आहे.

महाराष्ट्र बँकेच्या डेप्युटी मॅनेजरला मारहाण… बीड शहरातील धक्कादायक घटना..

Previous article

पंकजा मुंडेच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटीची रेड..

Next article

You may also like

Comments

Comments are closed.