इतर बातम्या

गौतमी बोल तू होती का माझी परी..

0

माझा कट्टा | डेस्क

– सध्या समाजातील कानाकोपऱ्यात जितका राजकीय विषय चर्चिला जातोय, किंबहुना त्यापेक्षाही जास्त, आपल्या अदांची भुरळ घालत नजरेच्या इशाऱ्याने घायाळ करणाऱ्या, गौतमी पाटलांची चर्चा सुरुय..आता या चर्चेत पुन्हा भर पडलीय. बीडच्या 26 वर्षीय रोहन गलांडे पाटील या तरुणाने गौतमीला पत्र लिहीत थेट लग्नाची मागणी घातलीय.” गौतमी तुझ्या इच्छा अटी सर्वमान्य..बोल तू होती का माझी परी..” असं म्हणत आपल्या घराचा पत्ता देत लग्नाला तयार असशील तर येऊन भेट, असं देखील त्याने म्हटलंय..

बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडे पाटील यांनी गौतमी पाटीलला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय, की गौतमी पाटील तु भारी तुझ्या घरी पन तु होती का माझी परी, मी रोहन गलांडे पाटील मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. पत्र लिहीण्याचे कारण एका मुलाखतीत तुला कसा जोडीदार हवाय हे सांगताना म्हणाली होती कि ,

“आता मी 25 वर्षांची आहे. लग्न करून घरसंसर थाटावा अशी माझी ईच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा, अशी माझी मनापासून ईच्छा आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे.”

तरी तुझ्या वरील तुझ्या सर्व इच्छा अटी मला मान्य आहेत. तरी मी रोहन गलांडे पाटील, मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तरी तु जशी आहेस, तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्या सोबत कुनी लग्नाला तयार नसले तरी मी मानुसकीच्या नात्याने तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय 26 वर्ष आहे व मी एक शेतकरी पुत्र आहे. त्यामुळे शेती बागायती आहे, दुग्ध व्यवसाय आहे. “तु जर माझ्या सोबत लग्नाला तयार असशील तर तु मला भेटायला ऐ. पत्ता मु.पो.चिंचोली माळी तालुका केज , जिल्हा बीड, या पत्त्यावर तु मला भेटायला ऐ, मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे.” असे रोहन गलांडे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान वराच्या शोधत असणाऱ्या गौतमी पाटील, बीडच्या या रोहन गलांडे पाटीलाला भेटायला जाणार का ? आणि त्याच्यासोबत लग्न करणार का ? हेचं पाहणं महत्वाचं ठरणार आहे…

राज्यात लवकरच ओबीसी ऐक्य यात्रा काढणार, राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्याक्ष कल्याण आखाडे यांची घोषणा..

Previous article

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी – ॲड. सुभाष राऊत

Next article

You may also like

Comments

Comments are closed.