छगन भुजबळबीड समता परिषदसमता परिषद

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी – ॲड. सुभाष राऊत

0

माझा कट्टा | डेस्क

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत यांनी केली आहे.

अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. छगनराव भुजबळ यांच्या आदेशान्वये याबाबत जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,’इंडिक टेल्स’ नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक, आद्य समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेलं आहे. सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा मी तीव्र निषेध करीत असल्याचे म्हटले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात असल्याचे म्हटले आहे. एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरु आहे. ही समाज विघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ॲड. सुभाष राऊत यांनी केली आहे.
याप्रसंगी संत नरहरी महाराज जयंती महोत्सवाचे संस्थापक ॲड. संदीप बेदरे, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन साखरे, बीड शहराध्यक्ष निखिल शिंदे, नितीन राऊत, मनोज भानुसे, बाळू साळुंके, धनंजय काळे, धर्मराज दुधाळ, अमोल दुधाळ, राम दुधाळ, नितीन शिंदे, वैभव गोरे, बाळासाहेब मगर आदींची उपस्थिती होती.

गौतमी बोल तू होती का माझी परी..

Previous article

पालकमंत्री अतुल सावे यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या आमदार आजबेंना माळी समाज जागा दाखवून देणार.

Next article

Comments

Comments are closed.