इतर बातम्या

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाचं असणार धनंजय मुंडेंचा संकल्प

0

माझा कट्टा | डेस्क

– येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री असणार आहे. असा मोठा संकल्प आज राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, की आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 25 वा वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने संबंध राज्यातच नाही तर देशातील अनेक भागात राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा केला जातोय. आमचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी या पक्षात सर्वांना स्थान दिले आहे. जसं छत्रपती शिवरायांनी रयतेला हवं असणार स्वराज्य निर्माण केलं. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार साहेबांनी उभा केलाय. त्यामुळे आज वर्धापन दिन साजरा करत असताना, येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री असणार आहे. असा संकल्प आम्ही केला आहे, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. ते बीडच्या शिरसाळा गावामध्ये बोलत होते..
काय म्हणालेत धनंजय मुंडे पहा…

कोण अजित पवार…? मी नुसतं बोलतोय लोकं आता जोड्याने मारतील – गोपीचंद पडळकरांचा पुन्हा एकदा पवारांवर सडकून निशाणा…

Previous article

बीडमध्ये द्वारकादास मंत्री बँकेचा बीड नगर पालिकेला दणका..

Next article

You may also like

Comments

Comments are closed.