Ajit PawarGopichand padalkarPankaja Munde

कोण अजित पवार…? मी नुसतं बोलतोय लोकं आता जोड्याने मारतील – गोपीचंद पडळकरांचा पुन्हा एकदा पवारांवर सडकून निशाणा…

0

माझा कट्टा | डेस्क

– कोण अजित पवार ? असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवारांवर सडकून टीका केलीय. “मी नुसतं बोलतोय लोक आता जोड्याने मारतील”. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वागलात, तर लोकं आता तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाहीत. असं म्हणत त्यांनी यावेळी अजित पवारांवर सडकून निशाणा साधलाय, ते बीडमध्ये मीडियाशी बोलत होते..

काय म्हणाले गोपीचंद पडळकर पहा एका क्लिकवर

तर यावेळी संजय राऊतांच्या प्रश्नांवर,
तुम्ही पवाराच्या घरी झाडू मारायला राहिलात, हा काय प्रकार आहे ? अरे दिल्लीमध्ये देशाचे पंतप्रधान आहेत. या राष्ट्राला पुढे न्यायचं काम करतात. प्रत्येक राज्याला भरीव असा निधी देतायेत. देशाला एका अवस्थेमध्ये आणणारा पंतप्रधान इतक्या वर्षानंतर देशाला मिळालाय. जगाच्या बाजारपेठेमध्ये देशाची उंची वाढवण्याचे फार मोठे काम केले. त्यामुळे लोक काय बोलतात ? याला फार महत्व देण्याचे काही काम नाही. अस म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या टिकेला उत्तर दिलं..

तर यावेळी पंकजा मुंडेंच्या नाराजगीवरून गोपीचंद पडळकर म्हणाले, की पंकजाताई भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या आहेत. आणि माननीय संघर्षयोद्धा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या त्या मोठ्या नेत्या असल्यामुळे इतर पक्षाच्या लोकांनी काहीही चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करू नये. भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं, भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केले आहे. त्यामुळे पंकजाताईंचा विषय हा एकदम व्यवस्थितपणे चालू आहे कोणीही चिंता करण्याची गरज नाही

तर यावेळी मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून, तो विषय माझा नाही, म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिडियापासून काढता पाय घेतला..

प्रीतम मुंडेंचे जाहीर कार्यक्रमातून खळबळजनक वक्तव्य ; म्हणाल्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तहसीलदारांना चिरीमीरी द्यावी लागते

Previous article

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाचं असणार धनंजय मुंडेंचा संकल्प

Next article

You may also like

Comments

Comments are closed.