ElectionPankaja Mundeधनंजय मुंडेनिवडणूकराजकारणराज्यशेतकरी

पुन्हा मुंडे बहीण भावाची होणार लढत..

0

माझा कट्टा | डेस्क

– दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या, परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून यामध्ये पुन्हा एकदा मुंडे बहीण- भावामध्ये लढत होणार आहे. आज 10 मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. तर 11 जून रोजी मतदान होईल आणि 12 जूनला कारखान्यावर कोणाची सत्ता येणार ? याचा निकाल हाती येईल.

वैद्यनाथ कारखान्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे वर्चस्व आहे. मात्र यावेळी राष्ट्रवादीचे नेते भाऊ धनंजय मुंडे हे देखील कारखाना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने दोघा बहीण भावात संघर्ष पाहायला मिळणार आहे

तर कारखान्याची ही निवडणूक 21 संचालक पदासाठी होणार आहे.10 मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून 16 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.17 मे रोजी छाननी होईल तर 18 मे ते 1 जूनपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे.2 जून रोजी चिन्ह वाटप होईल, तर 11 जून रोजी मतदान आणि 12 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान या निवडणुकीमध्ये दोघे मुंडे भाऊ वेगवेगळे पॅनल उभे करण्याची शक्यता असून यामुळे पुन्हा एकदा मुंडे बहीण भावाचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता वैद्यनाथ कारखान्यावर नेमकं कोणाची सत्ता येणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

प्रेमविवाह केल्याचा रागातून गर्भवती सुनेवर सपासप वार करून खून; सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

Previous article

गौतमी पाटील यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल..

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in Election