उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेजिल्हाठाकरे गटबीडब्रेकिंगमोठी बातमीराजकारणराज्यशिंदे सरकारसुषमा अंधारे

….अन्यथा उद्याची सभा उधळून लावणार ; शिंदे गटाच्या नेत्याचा इशारा

0

माझा कट्टा | डेस्क

– बीड जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेच्या अगोदरचं शिवसेना ठाकरे गटात चांगलंच घमसान सुरू झालाय. जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधरेंवर गंभीर आरोप करत, आपण सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा देखील केला आहे. तर आपल्याला मारहाण झाली नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तर या ठाकरे गटाच्या वादात आता शिंदे गटाने उडी घेतलीय.

काय म्हणाले वैजिनाथ वाघमारे पहा एका क्लिकवर

शिंदे गटात प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीने थेट उद्याची महाप्रबोधन यात्रेची होणारी सभा उधळून लावण्याचा इशाराच दिला आहे. सभेच्या नावाने अधिकाऱ्यांकडून जमा केलेले 5 लाख रुपये परत करा. अन्यथा उद्या होणारी ही महाप्रबोधनची सभा उधळून लावू, ही सभाचं नाहीतर यानंतरही महाराष्ट्रात होणाऱ्या ठाकरे गटाच्या सर्वच सभा आम्ही बाळासाहेबांचे आणि एकनाथ शिंदेंचे कट्टर आणि कडवट शिवसैनिक उधळून लाऊत. असा इशारा सुषमा अंधारे यांचे विभक्त पती आणि शिंदे गटाचे बीड जिल्ह्यातील नेते वैजनाथ वाघमारे यांनी दिला आहे.

ठाकरे गट राडा प्रकरण : जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी…

Previous article

महाप्रबोधन यात्रा ही फक्त कलेक्शनसाठी आहे ? शिंदे गट शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांचा गंभीर आरोप..

Next article

You may also like

Comments

Comments are closed.