आप्पासाहेब जाधवठाकरे गटबीडब्रेकिंगमोठी बातमीराजकारणराज्यसुषमा अंधारे

ठाकरे गट राडा प्रकरण : जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी…

0

माझा कट्टा | डेस्क

– उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना, “मी दोन चापटा लावल्याचा दावा करणाऱ्या”, जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यासह बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांची उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. उद्या बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा होत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर काल सायंकाळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह संपर्कप्रमुख धोंडू पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह पदाधिकारी हे, बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरातील सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते.

यादरम्यान सुरुवातीला ठाकरे गटात राडा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर काही वेळात जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी स्वतः व्हिडिओ जारी करत, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले.. पैसे घेऊन पद वाटप करतात, यासह अनेक गंभीर आरोप या व्हिडिओ मधून जाधव यांनी केले होते. आणि याच मूळचं मी त्यांना दोन चापटा लावल्या. असा दावा देखील व्हिडिओ जारी करत आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. मात्र मला मारहाण झाली नाही, विरोधकांकडून महाप्रबोधन यात्रा उधळून लावण्याचा प्रयत्न केला जातोय. अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.

दरम्यान आता उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाकडून जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांची उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळं आता महाप्रबोधन यात्रेच्या जाहीर सभेपूर्वीच, एवढं मोठं धुमशान सुरू असल्याने होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेच्या जाहीर सभेकडे, आता जिल्ह्याचचं नाही तर राज्याचे लक्ष लागलं आहे.

होय मी सुषमा अंधारेंच्या कानशिलात लगावली…? जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधवांनी जारी केला व्हिडिओ

Previous article

….अन्यथा उद्याची सभा उधळून लावणार ; शिंदे गटाच्या नेत्याचा इशारा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.