Electionनिवडणूकयोगेश क्षीरसागरराजकारणराज्य

नगरसेवक योगेश क्षीरसागरांची तुफान फटकेबाजी…भाऊ आमदार संदीप क्षीरसागरांच्या धक्काबुक्कीच्या व्हिडीओवर केलं भाष्य..

0

माझा कट्टा | प्रतिनिधी

– आमदार म्हणतात आमच्या घरातील एकही उमेदवार नगरपालिका निवडणूक लढवणार नाही..मात्र आता यांच्या घरात राहिलंच कोण आहे ? जो नगरपालिका निवडणूक लढेल..कुणाला सोडलंचं नाही यांनी त्रास द्यायचा, मग यांच्या सोबत कोण कसं राहील. मी अगोदर पासून म्हणत होतो, हे चांगले नाहीत..आता व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असं म्हणत नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी भाऊ संदीप क्षीरसागरांवर टीकास्त्र सोडत धक्काबुक्कीच्या व्हिडिओवर जाहीर भाष्य केलं. ते बीडमध्ये बाजार समिती निवडणूकीच्या जाहीर कार्यक्रमात बोलत होते..

ते म्हणाले, की आमदारांचे पीए प्रत्येक कार्यालयात बसतात.. दररोज हजार पाचशे मिळतील ते गोळा करतात.. मग सर्वजण एकत्रित पैसा करतात आणि आपली पैसे काढून मोठा हिस्सा आमदारांना देतात… जर यांच्या ताब्यात बाजार समिती गेली तर ते हमलांना देखील सोडणार नाहीत.. हमालांकडून देखील 50 रुपये का होईना टक्केवारी घेतील…असं सणसणीत टीकास्त्र योगेश क्षीरसागर यांनी भाऊ संदीप क्षीरसागरांवर केलंय.

ते पुढे म्हणाले, की यांच्यासोबत जे आहेत ते जुगार… गुटखा… वाळूच्या धंद्यावाल्या आहेत…त्यामुळे आतापर्यंत यांच्या बाहेरच्या गोडाऊनवर कारवाया झाल्या.. मात्र यांच्या ताब्यात जर बाजार समिती गेली… तर मग बाजार समितीचे एक नंबरचे गोडाऊन गुटख्यासाठी… दोन नंबरचा गोडाऊनमध्ये जुगार अड्डा…. तीन नंबरच्या गोडाऊनमध्ये वाळूचा स्टॉक… असं हे करतील. त्यामुळे व्यापारी आणि हमाल बांधवांना जगणं मुश्किल होईल.. असं म्हणत योगेश क्षीरसागर यांनी भाजप, शिंदे गट, ठाकरे गट यांनी एकत्रित मिळून केलेल्या पॅनलवर टीकास्त्र सोडले..काय म्हणालेत नगरसेवक योगेश क्षीरसागर पाहुयात…

https://youtu.be/ggmmW-NSQOo

केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी अभद्र युती करून विरोधक निवडणुक लढवत आहेत

Previous article

तोडपाणी अन नथीतून तिर मारणारी लोकं आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहेत – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचा विरोधकांवर निशाणा…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in Election