Electionजयदत्त क्षीरसागरजिल्हाठाकरे गटदेवेंद्र फडणवीसनिवडणूकबाजारसमितीनिवडणूकब्रेकिंगयोगेश क्षीरसागरराजकारणराज्यराष्ट्रवादीशिंदे सरकारशिवसेनाशेतकरीसंदीप क्षीरसागर

तोडपाणी अन नथीतून तिर मारणारी लोकं आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहेत – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचा विरोधकांवर निशाणा…

0

माझा कट्टा | प्रतिनिधी

– तोडपाणी अन नथीतून तिर मारणारी लोकं आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.. त्यांनी आपल्या आई- बापांना वर सांगितलंय, आपल्या 200 ग्रामपंचायती आहेत, सोसायटी आहेत. त्यामुळं आपलं पितळ उघडं पडेल म्हणून आपली झाकण्यासाठी हा उपद्रव्याप आणि खटाटोप विरोधकांचा सुरू आहे. असं म्हणत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते बीडमध्ये बाजार समिती निवडकीच्या अनुषंगाने आयोजित प्रचाराच्या कार्यक्रमात बोलत होते.

ते म्हणाले, की आज बीड बाजार समिती चांगली नावरूपाला आलीय. शेतकरी समृद्ध बनत आहे. विकासाच्या बाबतीत रेशीम उद्योगाच्या बाबतीत, आज आपण खरेदी सुरू केलीय. मोठ्या प्रमाणात रेशीम उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी येतात.. विशेष म्हणजे बेंगलोर, कलकत्ता भागातील व्यापारी त्या ठिकाणी रेशीम खरेदीसाठी येत आहेत. आणि मला वाटतं ही सगळी मालिका कामाची या ठिकाणी सुरू आहे. आणि ही अशीच भविष्यात सुरू रहावी, याला कुठे खंड पडू नये, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. मात्र याला खंड पाडण्यासाठी चांगलं काम कसं मोडीत काढायचं ? यासाठी हे तोडपाणी करणारे लोक नथीतून तीर मारणारे लोक प्रयत्न करत आहेत. मात्र आमचा विजय निश्चित आहे. अशा विश्वास यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विरोधकांवर टीका करत व्यक्त केलाय.

दरम्यान बीडमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. गेल्या 35 वर्षापासून बीड बाजार समितीवर जयदत्त क्षीरसागर यांची एकहाती सत्ता आहे. तर ही सत्ता मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी यासह शेतकरी संघटनांनी एकत्रित येत क्षीरसागरांविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळं या बाजार समितीच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळातून लक्ष लागले आहे..

काय म्हणाले जयदत्त क्षीरसागर पहा..

नगरसेवक योगेश क्षीरसागरांची तुफान फटकेबाजी…भाऊ आमदार संदीप क्षीरसागरांच्या धक्काबुक्कीच्या व्हिडीओवर केलं भाष्य..

Previous article

मला ही छापता आलं असतं… मला ही टक्केवारी घेता आली असती…पण… जयदत्त क्षीरसागर

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in Election