Gautami patilगौतमी पाटीलगौतमीपाटीलशोबार्शी

गौतमी पाटील यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल..

0

माझा कट्टा | डेस्क

आपल्या दिलखेच अदांनी घायाळ करत संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या गौतमी पाटील अडचणीत आल्या आहेत. दमदार डान्स करणाऱ्या गौतमी पाटील या त्यांच्या डान्स शोमुळेच अडचणीत आल्या आहेत. गौतमी पाटलांनी आपली फसवणूक केली आहे ! अशा आशयाची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलीय. राज्यातील सोलापूरातल्या बार्शीमध्ये गौतमीचा शो झाला होता. या शोच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता गौतमीच्या शोच्या आयोजकानेच गौतमी पाटीलांविरोधातच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

@@गौतमीसह तिघांविरोधात मानसिक त्रास दिल्याची तक्रार –

सोलापूरच्या बार्शीमध्ये गौतमी पाटीलचा शो झाला. बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड मित्र मंडळ या संस्थेने 12 मे रोजी गौतमी पाटीलच्या शोचे आयोजन केले होते. या शोचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी गौतमी आणि तिचा सहकारी केतन मारणे आणि सेक्रेटरी विनोद यांच्याविरोधात बार्शी पोलिस ठाण्यात धाव घेतलीय.याप्रकरणी त्यांनी गौतमी आणि तिच्या सहकाऱ्याने माझी फसवणूक करुन मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

@@पोलिसांनी शो बंद पाडला होता-

12 मे रोजी बार्शीत गौतमी पाटीलच्या शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोची वेळ सात वाजताची होती. मात्र गौतमी वेळवर न आल्यामुळे शो रात्री पावणे दहाच्याच्या सुमारास सुरु झाला. यावेळी गौतमी एकाच गाण्यावर नाचली नाही तोवर, बार्शी पोलिसांनी शो बंद पाडला. 10 वाजल्यानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी हा शो बंद पाडला. गौतमीचा शो पाहण्यासाठी सायंकाळी 6 वाजल्यापासून लोकांनी गर्दी केली होती. फक्त गौतमी एकाच गाण्यावर नाचून निघून गेल्यामुळे बार्शीकर नाराज झाले.

@@फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी –

एकतर गौतमी या कार्यक्रमाला उशिरा आली त्यात तिने शोसाठी ठरलेल्या मानधनापेक्षा मला वेठीस धरुन जास्त पैसे घेतले, असा आरोप तक्रारदार राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे. तसंच, नियोजित शोला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूकही केल्याचे, त्यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. यामुळं गौतमीसह तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

@@आयोजकाविरोधात गुन्हा दाखल –

दरम्यान बार्शीतल्या या शोप्रकरणी आधीच पोलिसांनी आयोजक राजेंद्र गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिलेली नसताना देखील त्यांनी या शोचे आयोजन केल्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 188, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135, 37(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आतापर्यंत राज्यातल्या अनेक कानाकोपऱ्यात गौतमी पाटलांच्या शोमध्ये राडा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये तर गौतमी पाटलांच्या शोमध्ये दगडफेक झाली होती. यामुळं गौतमीचा शो आयोजन करणारे अनेक आयोजक अडचणीत आलेले आहेत. मात्र आता आपल्या अदांनी भुरळ घेणाऱ्या खुद्द गौतमी पाटीलचं अडचणीत सापडल्या असून आता त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार का ? याकडं मात्र गौतमीचे याड लागलेल्या तरुणाईचे लक्ष आहे..

पुन्हा मुंडे बहीण भावाची होणार लढत..

Previous article

होय मी सुषमा अंधारेंच्या कानशिलात लगावली…? जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधवांनी जारी केला व्हिडिओ

Next article

Comments

Comments are closed.