Pritam mundeप्रीतम मुंडे

प्रीतम मुंडेंचे जाहीर कार्यक्रमातून खळबळजनक वक्तव्य ; म्हणाल्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तहसीलदारांना चिरीमीरी द्यावी लागते

0

माझा कट्टा | डेस्क

– दिव्यांगांना सगळं काही असताना, उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वर काही म्हणून तहसीलदारांना चिरीमिरी द्यावी लागते. असं खळबळजनक वक्तव्य खासदार प्रीतम मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमातून केलंय..त्या बीडच्या परळी शहरात दिव्यांग बांधवांच्या तपासणी शिबिराच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या..

काय म्हणाल्या भाजप खासदार प्रीतम मुंडे पहा

समाज कल्याण विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हाभरात सुरू असलेल्या पूर्व तपासणी आणि नोंदणी शिबिर आज परळी उपजिल्हा रुग्णालयात पार पडले आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी समाजातील वंचित उपेक्षितांच्या उत्थानासाठी तहहयात कार्य केले, त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. यंदाही प्रतिष्ठानच्या वतीने गरजू ,निराधार आणि दुर्लक्षित घटकांना आधार देणारा उपक्रम राबविला जात आहे.

दरम्यान या सर्व दिव्यांग बांधवांसाठी मी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतलीय. यामध्ये प्रत्येक तालुक्यात उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळावं, अशा सूचना केल्या आहेत. असंही यावेळी प्रीतम मुंडे म्हणाल्या…

पालकमंत्री अतुल सावे यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या आमदार आजबेंना माळी समाज जागा दाखवून देणार.

Previous article

कोण अजित पवार…? मी नुसतं बोलतोय लोकं आता जोड्याने मारतील – गोपीचंद पडळकरांचा पुन्हा एकदा पवारांवर सडकून निशाणा…

Next article

Comments

Comments are closed.