इतर बातम्याएकनाथ शिंदेकाँग्रेसकांदाकांदाअनुदानकांदाउत्पादकशेतकरीकृषिमंत्रीकृषीकृषीमंत्रीदौराजिल्हाठाकरे गटदेवेंद्र फडणवीसभाजपमहाविकासआघाडीराजकारणराज्यशिवसेनाशेतकरीसरकार

शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये सरकार तुमच्या पाठीशी – अब्दुल सत्तार

0

माझा कट्टा | प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि गारपीटग्रस्त भागाची मी स्वतः पाहणी केली. खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झालं आहे.. काही ठिकाणचं 99% नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.. तसेच आसमानी संकटाचा मुकाबला करणाऱ्या शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे, सरकार तुमच्या पाठीशी आहे. लवकरच तुम्हाला मदत केली जाईल. असा आश्वासन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बीडमध्ये बोलताना व्यक्त केला आहे. यावेळी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, कृषी अधिकारी बाळासाहेब जेजुरकर यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी तहसीलदार यांची उपस्थिती होती.

अतिवृष्टी गारपिट आणि अवकाळी मुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकार खंबीर आहे.. नुकसानीचे तंतोतंत पंचनामे करून महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ ज्या ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे. त्या सर्व भागातील शेतकऱ्यांना आसमानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी हात जोडून माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे.

लहान मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी ? डॉक्टर काय सांगतायत ?

Previous article

सत्ता हे टोल कलेक्शनचे माध्यम नाही..जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप क्षीरसागरांवर नाव न घेता सडकून निशाणा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.