कृषीजिल्हाराज्यशेतकरीसरकारहरभरा / चना

बीड जिल्ह्यात नाफेडचे 17 हरभरा खरेदी केंद्र सुरू; गेल्या पंधरा दिवसात या हमीभाव केंद्रावर 10 कोटींचा हरभरा खरेदी….

0

माझा कट्टा | प्रतिनिधी

– बीड जिल्ह्यात नाफेडचे 17 हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या नाफेडच्या केंद्रावर 31 मार्चपर्यंत 16 हजार 802 शेतकऱ्यांनी हमीदराने हरभरा विक्रीसाठी खरेदी केंद्रांकडे नोंदणी केली आहे. यापैकी केवळ 1 हजार 76 शेतकऱ्यांकडून सुमारे 10 कोटी रुपये मूल्याचा हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील बाजार समितीच्या मार्केट यार्डात हरभऱ्याची आवक होत राहिली. मात्र शासनाच्या हमीदरापेक्षा कमी दराने खरेदी होत होती. भाव कमी मिळत असल्याने बहुतांश शेतकरी त्यांच्याकडील हरभरा विकत नव्हते. दरम्यान ‘नाफेड’च्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून हरभरा खरेदीसाठी सुरुवात झाली.

27 फेब्रुवारीपासून इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी सुरू केली. सुरुवातीला नोंदणीची गती कमी होती; मात्र त्यानंतर नोंदणी संख्ये कमालीची वाढ झाली आहे. एकीकडे ही नोंदणी सुरू असताना जिल्ह्यातील निश्चित केलेल्या केंद्रांवर खरेदी प्रक्रिया सुरू झाली.

गेल्या दोन आठवड्यांत 107 शेतकऱ्यांचा 18 हजार 799 क्विंटल 66 किलो हरभरा 17 पैकी 11 खरेदी केंद्रांवर खरेदी करण्यात आला असून, येत्या काही दिवसांत खरेदीलाही वेग येणार आहे.

एटीएममध्ये मोबाईलवर बोलणं गुत्तेदाराला भोवलं..!

Previous article

आता गरीबाच्या घराचे स्वप्न होणार साकार; राज्य सरकारचा मोठा निर्णय..

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in कृषी