क्राईम न्यूजगंडाजिल्हाबीड पोलीसराज्य

एटीएममध्ये मोबाईलवर बोलणं गुत्तेदाराला भोवलं..!

0

माझा कट्टा | प्रतिनिधी

– एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या गुत्तेदाराला मोबाईलवर बोलणं चांगलचं भोवलं आहे.. गुत्तेदार बोलण्यात व्यस्त राहिल्याचा फायदा घेत, एका भामट्याने एटीएमची अदलाबदल करून 1 लाख 20 हजार रुपयांवर डल्ला मारलाय. हा प्रकार बीडच्या गेवराई शहरात भरदुपारी घडला असून याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुत्तेदाराला आपली हलगर्जी चांगलीच अंगलट आली असून एक – कॉल महागात पडला आहे.कलीम अहमद शेख वय 38, रा. कुरबु गल्ली, मोंढा रोड, गेवराई असं त्या गुत्तेदाराचे नाव आहे.

गुत्तेदार कलीम शेख यांच्याकडे वाळू, खडी व सिमेंट एकत्र करण्याची मशिन आहे. याची ते गुत्तेदारीही करतात. यादरम्यान ते गेवराई शहरातील बीड रोडवरील एसबीआय बँकेच्या एटीएम मशिनवर पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी अगोदरच एक व्यक्ती तेथे उभा होता. त्याने मशिन चालत नसल्याचे सांगितले.

त्यानंतर कलीम यांनी एटीएम कार्ड टाकून पाहिले तर 1 हजार रुपये निघाले. याचवेळी त्यांना मशिनवर मजूर असलेल्या विशाल राजपूत यांचा कॉल आला. त्यांच्याशी बोलत असतानाच या भामट्याने त्यांच्या हातातील एटीएम कार्डची अदलाबदल केली आणि निघून गेला. घरी गेल्यावर त्यांना आपल्या खात्यातून 1 लाख 20 हजार रुपये कमी झाल्याचे दिसले. दरम्यान गुत्तेदार कलीम शेख यांच्या फिर्यादिवरून बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

onion subsidy – कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी….कसा कराल अनुदानासाठी अर्ज….वाचा

Previous article

बीड जिल्ह्यात नाफेडचे 17 हरभरा खरेदी केंद्र सुरू; गेल्या पंधरा दिवसात या हमीभाव केंद्रावर 10 कोटींचा हरभरा खरेदी….

Next article

You may also like

Comments

Comments are closed.