इतर बातम्याक्राईम न्यूजगृहमंत्रीजिल्हाबीड पोलीसबीड मारहाणभाजपराज्यसरकार

महाराष्ट्र बँकेच्या डेप्युटी मॅनेजरला मारहाण… बीड शहरातील धक्कादायक घटना..

0

माझा कट्टा | प्रतिनिधी

– बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजरला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरामध्ये उघडकीस आली आहे. या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बीड शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा साठे चौक येथील डेप्युटी मॅनेजर रामप्रसाद येवले यांना मारहाण केल्या प्रकरणी भाजपचे नेते नवनाथ शिराळेंसह इतरांविरूध्द बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उद्धट वागणूक असल्याने व ग्राहकांना सतत त्रास देत असल्याने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे.

या मारहाणी संदर्भात नवनाथ शिराळे यांना विचारले असता बँक मॅनेजर कुठल्याच ग्राहकाला व्यवस्थित बोलत नाही. इंग्रजी मधून अर्ज लिहायला सांगतो. तसेच उद्धट उत्तर देतो. यामुळे हा वाद निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं..

डेप्युटी मॅनेजर रामप्रसाद गंगाराम येवले हे शासकीय कामकाज करत असतांना नवनाथ शिराळे यांनी बँकेत येवुन त्यांच्या खात्याचा खाते उतारा मागितला असता, डेप्युटी मॅनेजरने त्यांना ई-मेल आयडी मागितला. तो आयडी शिराळे यांनी मराठीमध्ये दिला, मात्र इंग्रजीमध्ये ई-मेल आयडी द्या, मराठीत चालत नाही, असे येवले यांनी सांगितले. त्याचा राग आल्याने शिराळे यांनी डेप्युटी मॅनेजर येवले यांना शिवीगाळ करायला सुरवात केली. त्याचवेळी त्यांच्या सोबतचे तिघेजण पाठीमागुन आले व लाथा बुक्क्याने मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार डेप्युटी मॅनेजर येवले यांनी दिली. त्यावरून नवनाथ शिराळे, कृष्णा नवनाथ शिराळे यांच्यासह इतर 2 अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video | बीड बसस्थानकाच्या कँटीनमध्ये गुंडागर्दी; वेटरकडून अपंग ग्राहकाला मारहाण..

Previous article

बीडच्या आमदारांची वडिलांनाच धक्काबुक्की ? आमदार विरोधात पित्याची पोलिसात तक्रार..

Next article

You may also like

Comments

Comments are closed.