इतर बातम्याकाँग्रेसजिल्हाठाकरे गटभाजपमहाविकासआघाडीयात्राराजकारणराज्यराष्ट्रवादीशिंदे सरकारशिवसेनासावरकरगौरवयात्रा

बीडमध्ये 6 एप्रिल ला भाजप शिवसेनेची सावरकर गौरव यात्रा निघणार…

0

माझा कट्टा | बीड

– स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने, भाजप शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. तर येणाऱ्या 6 एप्रिलला बीडमध्ये भाजप शिवसेनेची ही गौरव यात्रा निघणार असल्याची माहिती, भाजप जिल्हाध्यक्ष आणि शिवसेना जिल्हाप्रमुखांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे.

यावेळी ते म्हणाले, की काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून सतत सावरकरांचा अपमान केला जातोय. त्यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य ते करत असतात. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो. मात्र हे विरोधकांकडून केले जाणारे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी, येणाऱ्या तरुण पिढींना सावरकरांचे विचार कळावेत, यासाठी आम्ही सावरकर गौरव यात्रा काढत आहोत… आणि ही गौरव यात्रा 6 एप्रिलला बीडमध्ये निघणार आहे. अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुंडलिक खांडे यांनी दिली आहे

छत्रपती संभाजीनगर महाविकास आघाडीच्या सभेसाठी हजारो शिवसैनिक रवाना होणार -जिल्हाप्रमुख अनिल जगताप

Previous article

महाविकास आघाडीच्या नेत्यांना भाजप राज्य प्रवक्त्याचे खुलं आव्हान…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.