देवेंद्र फडणवीसनिलेश राणेभाजपराजकारणराज्यराष्ट्रवादीशिवसेनासुषमा अंधारे

हा कॉन्फिडन्स कुठून आला ? तुमच्या बोलण्यावर पण मर्यादा असल्या पाहिजे ! तुम्हाला बोलण्याचा अधिकार कोणी दिला ? निलेश राणेंचा सुषमा अंधारेंना सवाल…

0

माझा कट्टा | बीड

– सुषमा अंधारे ज्या तऱ्हेने बोलतात जसं की त्या दोन-तीन टर्म निवडणुका लढल्या आहेत. कधी मंत्री होत्या का ? त्यामुळे नेमका हा कॉन्फिडन्स त्यांच्यात कुठून आला ? हेच कळत नसल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. केज न्यायालयात 2020 मधील प्रकरणाच्या सुनावणीसाठी राणे आज केज न्यायालयात हजर झाले होते. अंधारे एकदा ही निवडणूक लढल्या नाही. माझ्यापेक्षा तुम्ही तीन वर्षांनी लहान आहात. भाषा वापरतात त्यावर मर्यादा आल्या पाहिजे. अंधारे ताईंनी देखील मर्यादा पाळल्या पाहिजे. त्यामुळे तुमचा अधिकार काय ? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर बोलता कोणत्या अधिकारांने तुम्ही बोलता. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. संजय राऊत रिकामटेकडे आहेत. त्यांना दुसरे काहीच काम नाही. महाराष्ट्रात त्यांची किंमत काय ? पत्रा चाळचा तो आरोपी आहे. संजय राऊत याचा काय संबंध म्हणत संजय राऊत यांनी टीका केली.

गिरीश बापट यांच्या निधनानंतर निलेश राणे यांची प्रतिक्रिया

Previous article

आम्ही काही गांधीवादी नाही – निलेश राणे..

Next article

You may also like

Comments

Comments are closed.