Electionजयदत्त क्षीरसागरनिवडणूकबाजारसमितीनिवडणूक

सूतगिरणी, दूध संघ आणि बँकेनंतर आता बाजार समितीतही यश मिळणारच – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

0

माझा कट्टा | प्रतिनिधी

सहकाराच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, दूध उत्पादक आणि गरजूंना आर्थिक मदत देणाऱ्या तीनही संस्था बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्याचबरोबर सूतगिरणी, दूध संघ आणि बँकेच्या निवडणुकीनंतर आता बाजार समितीतही चांगल्या फरकाने यश मिळेल. असा ठाम विश्वास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी विकास पॅनलच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज चौसाळा सर्कल मधील सर्व मतदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, जगदीश काळे, डॉ. योगेश क्षीरसागर, विलास बडगे, बाबुशेठ लोढा, अरुण डाके, गंगाधर घुमरे, गणपत डोईफोडे, नितीन लोढा, तानाजी कदम, सखाराम मस्के, शंकर चव्हाण, बाजीराव बोबडे, अॅड राजेंद्र राऊत, मनोज पाठक, राजाभाऊ क्षीरसागर, अंकुश काळासे, दिलीप आहेर, सतीश पाटील, अरुण बोंगाणे, कमलाकर नाईकवाडे, धनंजय जगताप, किशोर पिंगळे, अच्युत शेळके, नवनाथ घोडके, अर्जुन बहिरवाड, गणेश राऊत, बंडू लांडे, नानासाहेब पाटील, सुग्रीव रसाळ, धनंजय वाघमारे, मोहन झोडगे यांच्यासह बाजार समितीचे उमेदवार उपस्थित होते. यावेळी प्रारंभी जगदीश काळे यांनी प्रास्ताविक केले व त्यानंतर ज्येष्ठ नेते बाबुशेठ लोढा यांनी चौसाळा सर्कल मधून मोठ्या फरकाने उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले, की चौसाळा आणि परिसर निवडणुकीच्या काळात सातत्याने मला साथ देत आला आहे. यापुढे आता सर्वच निवडणुका होणार आहेत, ही तर सुरुवात आहे. आपल्याला शुभ शकुन झालेला आहे. गजानन बँक, दूध संघ आणि सूतगिरणीच्या निवडणुकांमध्ये आपल्या उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर सेवा सोसायटी आणि ग्रामपंचायतमध्ये देखील भरीव यश मिळाले आहे. आता बाजार समितीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत आपल्यापैकीच सभापती संचालक होणार आहेत. बाजार समितीची वाटचाल योग्य आणि पारदर्शी व्हावी, यासाठी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, कुठल्याही बँकेचे कर्ज न घेता आपली बाजार समितीची वाटचाल योग्य मार्गावर चालू आहे. शेतकऱ्यांना चार दिवस सुखाचे यावेत, शेतमाला योग्य भाव मिळून आर्थिक फायदा व्हावा, यासाठी सातत्याने आपण प्रयत्न केले आहेत. शासनाच्या चांगल्या योजना गावोगावी राबवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. आपल्याला सर्वांना माहीतच आहे, विरोधकांना ही निवडणूक कशासाठी लढाईची आहे, हे ओळखा संस्था ताब्यात ठेवणे हा आपला फायदा आहे. पण ही संस्था जे समोर येऊन मत मागत आहेत, त्यांच्याकडे गेली तर त्याची काय अवस्था होईल, याचा विचार करा. कुठल्याही मुद्दे नसताना सारेच एकत्र झाले आहेत केवळ विरोध म्हणून सगळ्यांनी हातात हात घेतला आहे. पण आता त्यांना कसा हात दाखवतात हे कळेलच. सूतगिरणी, दूध संघ आणि बँकेच्या निवडणुकीनंतर आता बाजार समितीतही यश मिळणारच आहे. असा ठाम विश्वास माजी मंत्री क्षीरसागर यांनी व्यक्त केलाय. दरम्यान यावेळी परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रात लवकरचं राजकीय भूकंप; जी चर्चा सुरुय ते नक्की होणारचं आहे, त्याच्याबद्दल कोणी शंका आणू नये –

Previous article

केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी अभद्र युती करून विरोधक निवडणुक लढवत आहेत

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in Election