क्राईम न्यूजखूनजिल्हापरळीराज्य

…त्याने विवाहितेचा हात धरला अन दिराने त्याचा काटाचं काढला…

0

माझा कट्टा | परळी

भाऊकीतील विवाहितेची छेड काढणं एका 23 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलंय. संबंधित विवाहितेच्या दिराने छेड काढणाऱ्या तरुणाचा काटाचं काढलाय. ही धक्कादायक घटना बीडच्या परळी तालुक्यात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बीडच्या परळी येथील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर दुचाकी आणि पीकअपमध्ये झालेल्या अपघाताला वेगळं वळण मिळालंय. मयत संपत्ती भारत पारवे वय 23 रा. डाबी ता. परळी याचा अपघातात मृत्यू झालाय. मात्र तो अपघात नसून अपघातातून घडवून आणलेला घातपातचं असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झालाय.

मयत संपत्ती भारत पारवे याने भावकितील विवाहितेचा हात धरून छेड काढली होती. याचा राग मनात धरून महिलेच्या दिराने संपत्ती याचा अपघात घडवून काटा काढलाय. परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी अवघ्या 6 तासात घातपाताचा पर्दाफाश केला केलाय. दरम्यान पोलिसांनी आरोपी दिराच्या मुसक्या आवळल्या असून गुन्हा दाखल केला आहे

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस 20 वर्षांचा कारावास; 50 हजाराचा दंड..

Previous article

गिरीश बापट यांच्या निधनानंतर निलेश राणे यांची प्रतिक्रिया

Next article

You may also like

Comments

Comments are closed.