एकनाथ शिंदेगृहमंत्रीजिल्हादेवेंद्र फडणवीसपरळीपोलीस दलभाजपमहिलाराजकारणराज्यशिंदे सरकारशिवसेनासरकारसुषमा अंधारे

पोलिसावर मोठा दबाव आहे – सुषमा अंधारे

0

माझा कट्टा | परळी

-मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. मात्र माझी तक्रार दाखल करून घेतली नाही माझं पोलिसांविषयी काही म्हणणं नाही.. मोठा दबाव आहे..मात्र देवेंद्रजी तुम्ही ठरवून विरोधकांमधल्या महिला राजकारण्यांवर हल्ला करण्याची सूट शिंदे गटातील नेत्यांना दिलीय का ? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

अगोदर सत्तार त्यांनतर गुलाब पाटील आणि आता संजय शिरसाट ज्या पद्धतीने स्टेटमेंट करत आहेत.
मात्र तरीही त्यांच्या विरोधात तक्रार घेतली जात नाही, त्यामुळं देवेंद्रजी या सर्वांसाठी फार ठामपणे तुम्ही उभे आहेत का ? असा सवाल देखील यावेळी सुषमा अंधारे यांनी केलाय.

मला मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि देवेंद्रजींना एकचं म्हणायचं आहे, मला आपल्या निर्णयक्षमतेमधलं एक प्रमाण द्या, की आपण एका पक्षाचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहात.. असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे..

आमदार संजय शिरसाठ यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार – सुषमा अंधारे

Previous article

राम नवमीच्या पार्श्वभूमीवर बीड पोलीस दलाची शांतता कमिटीची बैठक संपन्न…!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.