ऊसतोड कामगारक्राईम न्यूजगृहमंत्रीदेवेंद्र फडणवीसपोलीस दलबीड पोलीसमहिलामहिला अत्याचारराज्यसाखर कारखाना

उचल देण्याच्या बहाण्याने बोलावून महिलेवर बळजबरीने अत्याचार…

0

माझा कट्टा | बीड

– ऊसतोड कामगार महिलेला, ऊसतोडणीची उचल देतो. असे सांगून लाॅजवर बोलावून अत्याचार केलाय. ही धक्कादायक अन संतापजनक घटना बीडच्या वडवणीमध्ये उघडकीस आलीय.. याप्रकरणी मुकादमाविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकादम मुंजा रतन वाघमारे अस आरोपीचं नावं आहे.

पिडीतेन मुकदामाला फोन करत पुढच्या वर्षीसाठी ऊसतोडणीची उचल म्हणून पैसे देण्याची मागणी केली. यावर मुंजा वाघमारे याने तिला वडवणीला ये, असा निरोप दिला. वडवणीत आल्यावर कॉल केल्यानंतर त्याने एका लॉजचा पत्ता दिला. यावेळी तिच्याच गावातील दत्ता गायकवाड ही व्यक्ती खाली होती. त्याने पीडितेच्या चार वर्षांच्या मुलीला स्वत:जवळ ठेवत, मुकादमाकडून पैसे घेऊन खाली आल्यावर मुलीला घेऊन जा, असे सांगितले.

त्याप्रमाणे पीडिता पैसे आणण्यासाठी गेली असता दुसऱ्या मजल्यावर थांबलेल्या मुंजा वाघमारे याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. पीडितेने कशी तरी सुटका करत घर गाठले. पतीसह नातेवाइकांना हा प्रकार सांगितला व रात्री उशिरा वडवणी पोलिस ठाणे गाठले. दरम्यान पीडितेच्या फिर्यादीवरून मुकादम मुंजा वाघमारे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

…अशा कितीही सभा घेतल्या तरी युतीचेचं सरकार येणार – संदिपान भुमरे

Previous article

छत्रपती संभाजीनगर महाविकास आघाडीच्या सभेसाठी हजारो शिवसैनिक रवाना होणार -जिल्हाप्रमुख अनिल जगताप

Next article

You may also like

Comments

Comments are closed.