एकनाथ शिंदेगृहमंत्रीनिलेश राणेहाणामारी

मार्च एंडच्या नावाखाली ही कसली दंड भरून घेण्याची पद्धत…

0

माझा कट्टा | बीड

– मार्च एंडची सक्तीची वसुली करण्याच्या नावाखाली पोलिसांकडून चक्क दंडेलशाही सुरू आहे. याचदरम्यान बीड शहरात एका चार चाकी वाहनचालकात आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली.. विशेष म्हणजे दंड नंतर भरू असे सांगितल्यानंतरही पोलिसांनी ऐकले नाही. मग पोलिस आणि कारमधील प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली. यात एकप्रकारे पोलिस चक्क वाहनचालकाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे पोलिसांच्या दंड वसुली विरोधात सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

वाहनचालकाने गाडी अडविल्याचा राग मनात धरून पोलिस निरीक्षकांना शिवीगाळ केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे .याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, सीसीटीव्ही तपासा,आपण मारहाण केलेली नसून पोलिसांनीच आपल्याला धक्काबुक्की केल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते..

मात्र मार्च एंडच्या नावाखाली पोलिसांकडून चौका चौकात वाहने अडवून नागरिकांना त्रास दिला जात आहे. तसेच कोर्टामध्ये जाऊन दंड भरू म्हटल्यानंतर देखील आरेरावेची भाषा केली जात असल्याचं देखील नागरिकांमधून सांगितलं जात आहे..

व्हिडिओ पहा

अमेरिकन डॉलरचा पाऊस पडणारं एक गाव…!

Previous article

बीडमध्ये ईडी आणि सीबीआयचे छापे….!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.