अपघातक्राईम न्यूजखूनजिल्हा

…त्याने विवाहितेचा हात धरला अन दिराने त्याचा काटाचं काढला…

0

माझा कट्टा | बीड

बीडच्या परळी येथील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर दुचाकी आणि पीकअपमध्ये काल झालेल्या अपघाताला वेगळं वळण मिळालंय. मयत संपत्ती भारत पारवे वय 23 रा. डाबी ता. परळी याचा काल अपघातात मृत्यू झालाय. मात्र तो अपघात नसून अपघातातून घडवून आणलेला घातपातचं असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झालाय.

मयत संपत्ती भारत पारवे याने भावकितील विवाहितेचा हात धरून छेड काढली होती. याचा राग मनात धरून महिलेच्या दिराने संपत्ती याचा अपघात घडवून काटा काढलाय. परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी अवघ्या 6 तासात घातपाताचा पर्दाफाश केला केलाय. दरम्यान पोलिसांनी आरोपी दिराच्या मुसक्या आवळल्या असून गुन्हा दाखल केला आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आम आदमी पार्टीचे रूमणे मोर्चा

Previous article

श्रीराम हे हिंदू धर्मियांचे आदर्श दैवत – डॉ.सारिका क्षीरसागर

Next article

You may also like

Comments

Comments are closed.