आष्टीइतर बातम्या

Video | अबब…या ग्रामस्थ भाविकांचा नादच खुळा..

0

माझा कट्टा | डेस्क

– आतापर्यंत आपण नेत्यांचा दिमतीला असणाऱ्या कार्यकर्त्यांचा नाद आणि उत्साह पाहिला असेल..मात्र याला भाविकही कुठं माघे नसून ग्रामस्थ भक्तांचाही नादचं खुळा…असाच प्रत्यय आलाय बीडमध्ये…

निमित्त होतं बीडच्या आष्टी तालुक्यातील वेताळवाडी येथील 26 व्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे..या सोहळ्याची आलेल्या महंत महंत काशिनाथ महाराज यांचे भक्तांनी अनोखं स्वागत केलंय.

यावेळी फटाक्यांच्या अतिषबाजीत महंतांची सनरुफ असणाऱ्या आलिशान गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यादरम्यान डीजेच्या तालावर भक्तांनी ठेका धरला होता. तर जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळणही करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी शेकडो मीटर अंतरावर फुलांच्या पायघड्या घालून महंत काशिनाथ महाराज यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तर यामुळं याची पंचक्रोशीत जोरदार सुरू आहे.

पहा नेमकं कसं केलंय स्वागत ? फक्त एका क्लिकवर

दरम्यान वेताळवाडी येथे 26 व्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने संत वामनभाउ, संत भगवान बाबा यांच्या मंदिर कलशावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय.

सुमंत रूईकरांच्या मृत्युचे राजकारण करू नका जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे आवाहन.

Previous article

शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचे शरद पवारांना भावनिक पत्र

Next article

You may also like

Comments

Comments are closed.